Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक (gutkha transport) करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील (Talegaon Dabhade Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तळेगाव पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) गुटखा, तंबाखू आणि दोन बोलेरो पिकअप असा एकूण 39 लाख 59 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त (seized) केला आहे. याप्रकरणी बोलेरो गाडीवरील चालक आणि कामगारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक आकाश भालेराव (Akash Bhalerao) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बोलेरो पिकअप (एमएच 12 एसएक्स 2896) चालक आणि कामगार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सोमवारी (दि.19) रात्री नऊच्या सुमारास वर्णा हॉटेल जवळ करण्यात आली.
याप्रकरणी मंगळवारी (दि.20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
याच दरम्यान तळेगाव दाभाडे येथील वर्णा हॉटेलजवळील एका घराशेजारी मोकळ्या जागेत असलेल्या बोलेरो पिकअप मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत विमल पान मसाला (Vimal Pan Masala), तंबाखू आणि दोन बोलेरो पिकअप (Bolero pickup) असा एकू 39 लाख 59 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळी करित आहेत.

Web Title : talegaon dabhade police action in gutkha transport case property worth rs 39 lakh seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील 43 वर्षीय महिलेची फेसबुकवरून झाली त्याच्याशी ओळख, पुढं घडलं भलतच

Transgender Reservation | सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी 1 टक्के जागा राखीव, ‘या’ सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

Pune News | केंद्र सरकारच्या पाळत प्रकरणी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मूक आंदोलन