तळेगाव पोलिसांची एकाच दिवशी ७२ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेशिस्त वाहतूक सुरळीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनाही बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्त्यावर, चौकात पोलीस दिसत आहेत. सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोरात कारवाई सुरु आहे मंगळवारी एका दिवसात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७२ बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

[amazon_link asins=’B07H4PX6X6,B07DRJ4HD6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2108e58b-bbc6-11e8-a756-21df146e4cb6′]

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक निरीक्षक गावडे आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी हद्दीत सर्वच ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलला. यामध्ये ब्लॅक काच-०, ट्रिपल सीट बसणे-२७, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे-०५, राँग साईड-०६, लायसन्स नसणे-०१, धोकादायक रित्या वाहन चालविणे-११, नंबर प्लेट नसणे-०१ विदाउट हेल्मेट-०७, लायसन्स जवळ न बाळगणे-०२, ओपन फाळका-०१, पोलीसांचा ईशारा न मानणे-०२, नो पार्किंग-०१, सीटबेल्ट न लावणे-०१, रहदारीस अडथळा-०२, २७९ प्रमाणे-०९  बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ७९६ उमेदवार रिंगणात, २५ सप्टेंबरला मतदान

शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा बसवून, वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सर्व प्रथम पोलीस आयुक्तांनी हाती घेतले आहे. त्यामुळेच उलट्या दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर थेट खटले भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम २७९ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

अशा चालकांवर खटले भरून त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. त्या ठिकाणी न्यायधीश दंड ठोठावत आहेत. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात ही कारवाई मोठ्या पातळीवर सुरू आहे.