‘बडा पछताओगे’ गाण्यावर धिंगाणा घालणार्‍यांना चांगलाच ‘पछतावा’ झाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयाच्या समोर टिक टॉक वरील बडा पछताओगे या गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या रोडरोमियोंची तळेगाव पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. मुलींची छेड काढण्यासाठी लावलेले गाणे टोळक्याच्याच चांगले अंगलट आले असून त्यांनाच आता ‘बडा पछतावा हुआ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Pimpari Police
तळेगाव येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या पथकाने आज कॉलेज समोर दंगा करणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एका कॉलेजच्या परिसरात टीक टॉक वरील बडा पछताओगे या गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या दहा ते बारा रोडरोमियोंना त्यांच्या गाडीसहित पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना पालकांसमोर समज देत दंडात्मक कारवाई केली.

Pimpari Police

अशाच रोडरोमियोंना आळा घालण्यासाठी आज झालेली कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे, बंडू मारणे, पोलीस कॉन्स्टेबल विकास तारू सतीश मिसाळ आणि गणेश आंबवणे यांनी केली.

Visit : policenama.com