डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर काही तासातच तालिबाननं हल्ला करून 20 सैनिकांना मारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी यांच्यांत झालेल्या चर्चेनंतर तालिबानने काही तासात शांतता कराराला नकार दिला. तालिबानकडून कुंदुजच्या इमाम साहिब जिल्ह्यात एक मोठा हल्ला करण्यात आला ज्यात अफगाणिस्तानचे सैनिक आणि पोलीस मिळून 20 जण मारल्या गेले.

वृत्तानुसार, तालिबानींनी रात्री उशीरा हा हल्ला केला. प्रोविंशिअल कौन्सिलचे एक सदस्य सैफुल्ला अमीरी यांच्या मते तालिबानींनी तीन सैनिकी चौक्यांवर एकत्र हा हल्ला केला. याशिवाय उरुजगानच्या एका पोलीस ठाण्यावर देखील हल्ला झाला. 10 सैनिक, 4 पोलीस आणि 6 सर्वसामान्य माणसे यात मारल्या गेली. तर 7 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

शांती चर्चाला धक्का –
तब्बल 20 वर्ष लढा दिल्यानंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला होता. हा करार होतो ना होतो की त्याच्या काही तासात तालिबानने अफगाणिस्ताच्या सैन्यावर हल्ला केला. यापूर्वी अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी यांच्याशी चर्चा केली होती.

यापूर्वी कतारमध्ये अमेरिका तालिबान यांच्यात जगातील अनेक देशांसमोर शांतता करार झाला होता. ट्रम्प यांनी चर्चेनंतर सांगितले होते की शांतता करार कायम आहे. ट्रम्प यांनी या दरम्यान सांगितले होते की 29 फेब्रुवारीला करारावर स्वाक्षरी केली होती, त्यावर पुढे जाणे आवश्यक आहे. मी तालिबान नेत्यांशी चर्चा केली आहे. ती उत्तम झाली आहे.

काय आहे कतार करार –
अमेरिका 14 महिन्यात अफगाणिस्तानमधील सैनिक परत बोलावून घेणार होते. परंतु तालिबानच्या हल्ल्यानंतर शांतता करार कायम राहण्याची शक्यता कमीच आहे. या करारानुसार अमेरिका तालिबान करार 10 मार्चपासून सुरु होणार होता. परंतु फक्त तुरुंगात असलेल्या तालिबान्यांमुळे हा करार अजून होत नव्हता. परंतु त्यावरुन तालिबानची पिछेहाट झाली होती. तलिबानची अफगाणिस्तानकडे मागणी आहे की त्यांच्या 5,000 तालिबानी सहकाऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, परंतु अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी कोणत्याही चर्चेपूर्वीच याला नकार दिला.