Taliban Got Amrullah Salehs Treasure | तालिबानला मिळाला अमरुल्लाह सालेहचा खजिना, जाणून घ्या एकुण किती किंमत?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Taliban Got Amrullah Salehs Treasure | अफगाणिस्तानच्या पंजशीर खोर्‍यात एका मोठ्या भागावर कब्जा केल्याचा दावा करणार्‍या तालिबानला मोठा खजिना (Taliban Got Amrullah Salehs Treasure) सापडला आहे. तालिबानकडून दावा करण्यात आला आहे की, हा खजिना इतर कुणाचा नसून, अमरुल्लाह सालेहचा आहे. तालिबानला हा मोठा खजिना सालेहाच्या घरातून मिळाला आहे.

तालिबानला सालेहाच्या घरातून 6.5 मिलियन डॉलर (सुमारे 48 कोटी रुपये) मिळाले आहेत.
असेही म्हटले जात आहे की, खजिन्यात तालिबानला सोन्याच्या विटासुद्धा सापडल्या आहेत.
अमरुल्ला सालेह स्वता कार्यकारी राष्ट्रपती असल्याचा दावा करतात.

तालिबानकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तालिबानचे काही दहशतवादी डॉलरचे गठ्ठे एका बॅगमध्ये भरताना दिसत आहेत.
यासोबतच त्यांच्या जवळ असलेल्या सोन्याच्या विटादेखील दिसत आहेत.

असे म्हटले जात आहे की, जर तालिबानच्या दाव्यात थोडी जरी सत्यता असेल तर यामुळे बंडखोरांच्या आंदोलनाला मोठा झटका बसू शकतो.
यापूर्वी तालिबानी अमरुल्ला सालेहच्या घरापर्यंत पोहचले होते. त्यांनी सालेहच्या घरावर सुद्धा कब्जा केला होता.

 

नाटो महासचिव जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी मागील सरकारचे त्वरित पतन होण्यास अफगाणिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे.
टोलो न्यूजने रविवारी सांगितले की, स्टोलटेनबर्ग यांनी म्हटले की, मागील सरकारच्या पतनासाठी अमेरिका आणि नाटो जबाबदार नाही.

त्यांनी म्हटले की, अफगाण सुरक्षा दलांच्या काही विभागांनी धाडसाने लढाई लढली.
परंतु ते देशाला सुरक्षित करण्यात अयशस्वी ठरले, कारण अखेर, अफगाण राजकीय नेतृत्व तालिबानशी सामना करणे आणि तो शांततापूर्ण तोडगा काढण्यात अयशस्वी ठरले जे अफगाणी नागरिकांना हवे होते.

त्यांनी म्हटले अफगाण नेतृत्वाच्या या विफलतेमुळे आज आम्ही या संकटाचा सामना करत आहोत.
स्टोल्टेनबर्ग यांच्यानुसार, यूएस-नाटो सैनिकांचे परतणे पूर्वनियोजित होते.
आणि ते अफगाण राज्याच्या पतनाचे कारण नव्हते.

 

Web Title : Taliban Got Amrullah Salehs Treasure | afghanistan taliban got amrullah salehs treasure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | 11 गावांच्या प्रारुप विकास आराखड्यास 6 महिने मुदतवाढ ! प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे

MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षा 4, 5 आणि 6 डिसेंबरला मुंबई-पुण्यासह ‘या’ 6 जिल्हा केंद्रावर होणार

Thackeray Government | सोमय्यांच्या आरोपानंतर आता ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे