Taliban New Government | चीन अन् PAK सह ‘हे’ तालिबानचे 6 खास मित्रराष्ट्र, सरकार स्थापना सोहळ्यासाठी मिळाले आमंत्रण; जाणून घ्या भारत काय करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Taliban New Government | तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार बनवण्याची तयारी सुरू केली आहे. तालिबानने सरकार स्थापनेदरम्यान (Taliban New Government) होणार्‍या कार्यक्रमात काही देशांना निमंत्रणसुद्धा पाठवले जे त्यांचे खास मित्र आहेत.

तालिबानने तुर्की, चीन, रशिया, इराण, पाकिस्तान आणि कतारला या सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे.
हे देश सातत्याने तालिबानचे समर्थन करत आले आहेत आणि आता जेव्हा सरकार स्थापन होत आहे त्यांना निमंत्रण पाठवले आहे.

तालिबानने ज्या देशांना आमंत्रण पाठवले आहे, त्यांच्यापैकी कतार वगळता बाकी सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे अमेरिकेचे शत्रू आहेत.
अमेरिकेने तालिबानसोबत जी चर्चा केली, ती सुद्धा कतारच्या दोहामध्ये झाली होती.
अमेरिकेचे परत जाणे हा आपला विजय असल्याचे तालिबानने अगोदरच सांगितले आहे.

चीन-रशियासोबत अमेरिकेचे कोल्ड वॉर सुरू आहे, पाकिस्तान-इराणवर सुद्धा अमेरिका अनेक प्रकारचे प्रतिबंध लावत आली आहे.
तुर्कीसोबत सुद्धा ट्रम्प प्रशासनादरम्यान स्थिती पूर्णपणे बिघडली होती.

काबुलच्या राष्ट्रपती भवनात तालिबानच्या सरकारची स्थापना होणार आहे.
मुल्ला बरादरला तालिबानी सरकारचा प्रमुख बनवले जाऊ शकते.
तर मुल्ला हिब्तुल्ला अखुंदजादाला सुप्रीम लीडर बनवले जाऊ शकते.

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत म्हटले की, तालिबानला जगासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत.
चीन आमच्यासाठी एक महत्वाचा देश आहे, तो जगातील आर्थिक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानला स्वताला पुढे जाण्यासाठी त्यांची सोबत हवी आहे.

Web Title : Taliban New Government | taliban new government invites china pakistan iran russia qatar turkey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona 3rd Wave | नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट? वीकएंड Lockdown ची घोषणा

Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज 417 रुपये गुंतवा, व्हाल करोडपती; जाणून घ्या

Dr. Mohan Agashe | नाट्यगृह आता खुली झाली पाहिजेत : ज्येष्ठ कलाकार डॉ. मोहन आगाशे