‘तळजाई’वर टँकरने पाणी ; पण कोट्यवधी रुपये कुठे ‘जिरले’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – तळजाई टेकडीवरील पालिकेच्या जैववैविध्य उद्यानाच्या प्रस्तावित कामामुळे दोन ‘मान्यवरां’च्या वादात आता प्रशासनाची कोंडी झाली आहे. पर्यावरणप्रेमींनी लावलेल्या हजारो वृक्षांची ‘कत्तल’ रोखण्यासाठी एका ‘माननीयां’नी घेतलेला आक्रमक पवित्रा प्रशासनाने फौजदारी कारवाई करून रोखला असला तरी दुसऱ्या ‘माननीयां’नी ही दंड थोपटले आहेत. त्यात हे प्रकरण आता पेटले आहे. तळजाई टेकडीवर वृक्षारोपण केलेली झाडे जगविण्यासाठी टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्याचा ‘हिशेब’ मागितला जात असल्याने आता प्रशासन कोंडीत सापडले तर आहेच, शिवाय कोट्यवधी रुपये ‘पाण्या’त कसे गेले याचे उत्तर कसे द्यायचे या पेचातही प्रशासन अडकले आहे.

पालिका प्रशासनात सध्या तळजाई टेकडीचा मुद्दा गाजतोय. माहिती अधिकारात उत्तर कसे द्यायचे, विषयाला कशी बगल द्यायची यावरच ‘काथ्याकूट ‘ सुरु आहे. तळजाई टेकडीवर जैववैविध्य उद्यानाच्या प्रस्तावित कामामध्ये सोलर रूफ पार्किंगला एका ‘माननीयां’नी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते या प्रकल्पात आजवर पर्यावरणप्रेमींनी लावलेल्या अनेक झाडांचा बळी जाणार आहे. आणि येथील अनेक प्रकल्पाना त्यांनी विरोध दर्शविला आहे. इतकेच काय येथे साकारलेल्या कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमच्या उदघाटनावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कार्यक्रमावरही अनेकांनी बहिष्कार घातला होता. या ठिकाणी नियोजित पार्किंगसाठी काम सुरु होणार आहे. विशेष म्हणजे हे पार्किंग सोलर रूफ असणार आहे. मात्र त्यासाठी झाडांचा बळी जाणार असल्याचा आक्षेप घेऊन हे काम रोखण्यात आले.

 

दुसरीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी टेकडीवर पाईपलाईनने आणून या प्रकल्पासह टेकडीवरील वृक्षराजी जतन करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र श्रेयाच्या राजकारणाचा फटका येथील प्रकल्पाना बसल्याने प्रकरण फौजदारी कारवाईपर्यंत पोहचले आहे. त्यात दोन्ही ‘माननीय’ आमनेसामने आल्याने आता प्रकरण एकमेकांचे ‘उद्योग’ बाहेर काढण्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे . त्यानुसार टेकडीवर टँकरद्वारे वृक्षराजींना पाणी देण्यासाठी गेल्या दहा -पंधरा वर्षात किती रक्कम खर्च करण्यात आली? तसेच किती झाडे लावण्यात आली? याबाबत माहिती अधिकारात याची माहिती विचारण्यात येणार असल्याने पालिका प्रशासन आता कोंडीत सापडले आहे.

माहिती कशी टाळायची यापेक्षा टँकरच्या पाण्यावर किती कोटी रुपये खर्च झाले याचा ‘हिशोब’ अंगलट येईल याचीच धास्ती संबंधित विभागाला आहे. आता समेट कसा करायचा? या पेचात असणाऱ्या प्रशासनाला एका उद्यानावर आजवर कितीची रक्कम खर्ची घातली या प्रश्नाने ‘त्या ‘ विभागाला धडकी भरली आहे. दोन माननीयांचा वाद कसा अंगलट येतो याचीच चर्चा सध्या सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे टँकरने दिलेले पाणी कुठे मुरले यापेक्षा कोट्यवधी रुपये कुठे ‘जिरले’ हाच प्रश्न आता ऐरणीवर आला आहे, त्यात ‘त्या’ उद्यानाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

सिनेजगत

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

सार्वजनिक कार्यक्रम चालु असताना ‘त्या’ अभिनेत्रीचा ड्रेस सटकल्याने वातावरण ‘गरम’

#MeToo : नाना पाटेकरांना ‘क्‍लीन चीट’ दिल्याने भडकली तनुश्री, केलं मुंबई पोलिसांबद्दल केले ‘गंभीर’ वक्‍तव्य