प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Pratap Saranaik | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( ShivSena MLA Pratap Saranaik’s letter) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(Chief Minister Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट होऊन दहा दिवस उलटल्यानंतर आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमात हे पत्र आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या लेटरबॉम्बनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल की काय अशी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला राजधानी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली होती. मोदी-ठाकरे यांच्यात बंद खोलीत स्वतंत्र चर्चाही झाल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 जूनला सरनाईकांनी ठाकरे यांना हे पत्र लिहिले. मुख्यमंत्री कार्यालयाने 10 जूनला पत्र मिळाल्याची पोच दिली आहे. आमदार सरनाईकांनी (MLA Pratap Saranaik) पत्रात ( letter) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

भाजपसोबतच्या वितुष्टामुळे आपल्या कुटुंबामागे चौकशीचा ससेमिरा लागला. अशीच परिस्थिती मंत्री अनिल परब आणि आमदार रवींद्र वायकर यांची आहे.
राज्यात सत्ता असूनही कसलीच मदत झाली नाही, या लढ्यात एकाकी पडल्याची भावनाही आमदार सरनाईक ( MLA Pratap Saranaik) यांनी मांडली आहे.

… तर शिवसेना वेगळा विचार करू शकते

शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. यामुळे नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क साधून डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू झाले आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी अशाच सुरू राहिल्यास शिवसेना वेगळा विचार करू शकते, असा इशारा देखील पत्रातून देण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : talk political quake again after shivsena mla pratap sarnaik letter sparks controversy

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी