आता स्वत:शी, झाडांशी, पाना-फुलांशी आणि प्राण्यांशीही बिनधास्त बोला

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकदा स्वत:शीच बोलणं, झाडं-फुलांशी बोलणं, पाळीव प्राण्यांशी किंवा आवडत्या वस्तूंशी बोलणं हे काहींना वेडेपणाचं लक्षण वाटतं. मात्र, हा गैरसमज असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. उलट हा आरोग्य चांगलं ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळं आत दडलेला त्रास, वेदना, विचार कमी होतात. वेगवेगळ्या आजारांपासून सुटका मिळते.

अभ्यासकांनुसार, जे लोक नेहमी स्वत:शी बोलतात, त्यांच्या विचारात आणि समजूतदारपणात फार वाढ होते. भलेही स्वत:शी बोलणे चांगलं दिसत नसेल पण अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, याने लहान मुलांच्या वागण्याला एक वळण लागण्यास मदत मिळते. स्वत:शी बोलण्याने वयस्कांमध्ये विचार, समज आणि उत्तर देण्याच्या क्षमतेत फार सुधारणा होते. पाळीव प्राण्यांसोबत गप्पा केल्याने तुमची सामाजिक बुद्धिमत्ता दिसते. शिकागो यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका शोधानुसार, पाळीव प्राण्यांसोबत बोलता तेव्हा एक आपलेपणाची जाणीव होते. आनंद मिळतो. तुम्ही एकटे असूनही एकटे राहत नाहीत. त्यामुळे पाळीव प्राण्यांशी बोला. काहीही बोला. हे असं होतं कारण ते केवळ इमानदारच असतात असं नाही तर ते एक चांगले श्रोतेही असतात. त्यांच्याशी बोलण्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

मनातल्या मनात बोलल्याने मेंदू फिट ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असते. याने आपले विचार सुनिश्चित होतात आणि स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे स्वत:शी बोलणे हा कोणताही मानसिक आजार नाहीये. याने स्ट्रेस कमी होतो, आनंद मिळतो, रिलॅक्स होतं आणि मूडही चांगला होतो. म्हणजे अर्थात काय तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. एका दुसऱ्या शोधात असं समोर आलं की, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळीव प्राण्यांशी बोलणे सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे. कारण अशा एखाद्या समोर आपल्या भावना शेअर करणे सोपं असतं. कारण ते तुमच्या गोष्टींवर काही प्रतिक्रियाही देत नाहीत आणि तुम्हाला चूक किंवा बरोबरही ठरवत नाही.

पाळीव प्राणी खासकरून कुत्रे हे मनुष्यांद्वारे वापरल्या गेलेल्या अनेक शब्दांना समजून घेण्यास सक्षम असतात. ते आपला आवाज, शरीराची भाषा आणि इशाऱ्यांना चांगल्याप्रकारे समजू शकतात. जास्तीत जास्त लहान मुलांची त्यांच्या पाळीव प्राण्यांशी एक खास जवळीकता असते. ते एकट्यात त्यांच्याशी बोलतात. अशी मुलं-मुली दुसऱ्या लोकांशी नातं कायम करण्यात तरबेज असतात. खासकरून ऑटिज्म किंवा इतर शिकण्या-समजून घेण्याच्या समस्यांनी पीडित लहान मुलं मनुष्यांच्या तुलनेत पाळीव प्राण्यांशी अधिक चांगल्याप्रकारे बोलू शकतात.