भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याशी बोला… ‘हा’ मानसिक आजार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल मुले मुली स्वतःशी काहीतरी बाेलत असतात. किंवा काहीवेळा नकळत हसत असतात. स्वतःशी च नाही तर प्राण्यांशी, झांडांशी, आवडत्या वस्तुशी, बाेलता बाेलता मनातील सर्व भावना शेअर करत असतात. पण काहीवेळा घरातील व्यक्ती किंवा बाहेरचे लाेक यांना वेड समजतात. याउलट यांच्यावर हसतात. त्यांची टिंगल करतात. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळीव प्राण्यांशी बोलणे सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे.. याने तुमच्या आत दडलेला त्रास, वेदना, विचार कमी होतात. अर्थातच याने वेगवेगळ्या आजारांपासून सुटका मिळते.

अभ्यासकांनुसार, जे लोक नेहमी स्वत:शी बोलत असतात. त्यांच्या विचारात आणि समजूतदारपणात फार वाढ होते. काहींना स्वत:शी बोलणे चांगलं दिसत नसेल पण ‘जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी’ मध्ये प्रकाशित एका शोधात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, स्वत:शी बोलण्याने वयस्कर लोकांनाही मदत मिळते का? तर या शोधातून असे समोर आले की, स्वत:शी बोलण्याने त्यांच्यामध्ये ही विचार, समज आणि उत्तर देण्याच्या क्षमतेत फार सुधारणा होते.

पाळीव प्राण्यांशी बोलणे
तुमच्या घरात जर पाळीव प्राणी असतील त्यांच्यासमोर मन मोकळं करा. कारण प्राण्यांसोबत बोलल्याने तुमची सामाजिक बुद्धिमत्ता दिसते. जेव्हा तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत बोलता तेव्हा एक आपलेपणाची जाणीव होते. आनंद मिळतो. तुम्ही एकटे असूनही एकटे राहत नाहीत. त्यामुळे पाळीव प्राण्यांशी बोला. काहीही बोला. त्यांच्याशी बोलण्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

स्वत:शी बोलणे
स्वत:शी बोलताना तुम्हाला कुणी पाहिलं तर अजिबातच त्यात काही लाज वाटण्यासारखे नाही. कित्येकदा स्वत:शी बोलण्याला मानसिक आजार असल्याचे समजले जाते. जे लोक मनातल्या मनात किंवा जोरात बोलतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. मनात स्वत:शी बोलल्याने तुम्हाला स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. हा मानसिक आजार नाही. यामुळे स्मरणशक्तीही वाढते. याने तणाव कमी होतो, आनंद मिळतो आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं.