अहमदनगरमधील १७ जण हद्दपार, तालुका दंडाधिकाऱ्यांची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – महानगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी काही व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. नगर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे दाखल झालेल्या हद्दपारीच्या प्रस्तावापैकी १७ जणांना १० डिसेंबर पर्यंत हद्दपार करण्यात आल्याचा आदेश तहसीलदार शिंदे यांनी जारी केला आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडील प्रस्तावांची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनपा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने निवडणुकीस बाधा पोहोचवतील, अशा संशयित व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत विविध पोलीस ठाण्यांकडून मागील आठवड्यात हद्दपारीचे प्रस्ताव दाखल झाले. यात उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे ४८१ हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी पूर्ण झाली असून, आदेश अंतिम टप्प्यात आहेत. अशा संशयित व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत भिंगार केम्प व कोतवाली पोलिस ठाण्यांकडून १७६ प्रस्ताव नगर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे दाखल झाले. यात आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड यांचा समावेश आहे.

साताऱ्यात शिवसेनेची आज महाआरती
सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा रामजन्मभूमी अयोध्या येथे २ दिवसांचा नियोजित दौरा असून शनिवार २४ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. अयोध्येत शरयू नदीकाठी साधूसंत व देशभरातील लाखो रामभक्त तसेच शिवसैनिकांच्यासमवेत महाआरती करणार आहेत. त्याचसमयी महाराष्ट्रासह देशभरात महाआरती होणार असून शिवसेना सातारा शहराच्या वतीने त्याच वेळेस महाआरतीचे आयोजन शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदीर, राधिका चौक, येथे करण्यात आलेले आहे.

सर्व शिवसेना आजी – माजी पदाधिकारी युवासेना, महिला आघाडी, महाराष्ट्र वाहतूक सेना व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे व सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी केले आहे.

धक्कादायक… जोतिष्यासह सावकाराने केला विवाहितेवर बलात्कार