Talwade Fire Case | ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Talwade Fire Case | तळवडे येथील स्पार्कल कँडल (Sparkle Candles) बनवणाऱ्या कारखान्यात स्टोट होऊन सहा महिलांचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक, तसेच दोन महिलांवर देहुरोड पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Talwade Fire Case)

याबाबत तळवडे उप अग्निशन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य Balasaheb Vishwanath Vaidya (वय-38) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehurod Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन महिला, शरद सुतार (वय-40), नजीर अमिर शिकलगार (रा. संतोषी मातानगर, मोहननगर, चिंचवड) यांच्यावर (Pune Pimpri Chinchwad Crime News)आयपीसी 304(2), 285, 286, 337, 338 सह The Explosive Act नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नजीर शिकलगार याला अटक केली आहे. (Talwade Fire Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथील ज्योतिबा नगर येथे राणा फॅब्रिकेशन
कंपनीच्या (Rana Fabrication Company) आतील बाजूला शिवराज एंटरप्रायजेस कंपनी होती.
वाढदिवसाच्या केकसाठीचे स्पार्कल कँडल बनवण्याचे काम या ठिकाणी सुरु होते.
त्यासाठी स्फोटक व ज्लावाग्राही पदार्थाचा वापर बेकायदेशीर व विनापरवाना केला.
कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीही उपाययोजना केली नाही.
त्यामुळे कामगारांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही शरद सुतार, नजीर शिकलगार आणि दोन महिलांनी ही कंपनी बेकायदेशीर विनापरवाना चालू ठेवून कंपनीतील सहा कामगारांच्या मृत्यूस तसेच दहा कामगारांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाले, असे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे (Sr PI Ajit Lakde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | ‘24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल’, जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा दिला इशारा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार