बेरोजगारीच्या मुद्द्यावरून ‘भडकली’ तमन्ना भाटीया !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अ‍ॅक्ट्रसे तमन्ना भाटीया म्हणते की, लोकांना असं वाटतं की, माझ्याकडे काम नाहीये. कारण आजकाल मी बॉलिवूडमध्ये दिसत नाही. हे चुकीचं आहे. कंडेन कादलै, 100 प्रतिशत लव, बाहुबली फ्रेंचाईजी, अयन, पाईया अशा अनेक हिट सिनेमात काम करणारी तमन्ना हे साऊथ सिनेमातील एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु तिनं अद्याप बॉलिवूडमध्ये खास प्रभाव पाडलेला नाही.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना तमन्ना म्हणाली, “मी साऊथ इंडियन सिनेमात विविध शैलीत काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मी बॉलिवूडपासून सक्रियरुपात दूर आहे. कारण याची खात्री व्हावी की, माझ्यात एक अष्टपैलुत्व आहे मी मला एका निश्चित शैलीपुरतच मर्यादित ठेवत नाहीये. तुम्ही तुमच्यातील अष्टपैलुत्वामुळंच टिकू शकता. सिनेमाबद्दल माझ्यात कायमच एक आवड राहिली आहे. मी कधीच मला एका इंडस्ट्रीतपुरतच मर्यादित नाही ठेवलं आणि माझी तशी इच्छाही नव्हती. इमानदारीनं सांगायचं झालं तर माझ्याबद्दल अनेक चुकीच्या धारणा आहे.”

पुढे बोलताना तमन्ना म्हणते, “माझ्या सर्वात विचित्र बातमी जी मी आता वाचली, ती म्हणजे अशी होती की, मी सध्या बेरोजगार आहे. अशाही अनेक कहाण्या आहेत की, टॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये माझं उज्ज्वल भविष्य नाही. मी वर्षातील 365 दिवस काम करत असते. मी कोणत्याही रेसचा हिस्सा नाही. नाही मला कोणासमोर सिद्ध करायचं आहे. माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा आहे, इडंस्ट्री नाही.”