अभिनेत्री तमन्ना भाटीया रॅम्प वॉक करताना ‘Oops’ मुमेंटची शिकार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री आपल्या शानदार वार्डरोब आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखल्या जातात. परंतु अनेकदा त्यांचा ड्रेस त्यांना धोका देतो. कालच अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडेचा उप्स मुमेंटची शिकार झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अभिनेत्री तमन्ना भाटीयासोबतही असंच काहीसं झाल्याचं दिसत आहे. तमन्ननालाही आपल्या ड्रेसमुळं लाजीरवाणं वाटलं आहे.

अलीकडेच तमन्नानं बॉम्बे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केलं होतं. यावेळी तिनं ब्राऊन कलरचा ड्रेस घातला होता. या थाय हाय ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु ड्रेसमध्ये काही चूक झाल्यासारखं दिसत होतं. तिचा ड्रेस जरा जास्तच वर सरकला होता. यामुळं तिचे अंडरगारमेंट्स स्पष्ट दिसत होते. जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा तिलाही लाजिरवाणं वाटलं. सध्या तमन्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत आहेत.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत बोले चूडिया या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय सीटीमार या तेलगू सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तमन्नानं चांद सा रोशन चेहरा या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मनासारखं काम न मिळाल्यानं तिनं तेलगू आणि तमिळ सिनेमात काम करण्यास सुरूवात केली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हिंमतवाला, द हमशकल्स, खामोशी, बाहुबली, रिबेल, से रा नरसिंहा रेड्डी, अयान, पैरा, सिरुथई, धर्मा दुरै असे अनेक तिचे सिनेमे सांगता येतील.

https://www.instagram.com/p/B9vq7PIlyX8/

https://www.instagram.com/p/B9wR1itHx1_/

https://www.instagram.com/p/B9y5tmWgrfN/

https://www.instagram.com/p/B9ynunDpJwr/