नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

मुंबई : वृत्तसंस्था – नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ही गोष्ट हळूहळू सामान्य होत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनने मौनी रॉय सोबत चित्रपट ‘बोले चूड़ियां’ ची घोषणा केली होती. नंतर या चित्रपटातून मौनी रॉय बाहेर जाणार अशी बातमी कळाल्यानंतर सगळेजण परेशान झाले होते. काही अभिनेत्रींनी त्याचे चित्रपट सोडायची ही पहिली वेळ नाही. या आधी ‘बाबूमोशाय बंदूकबाज़’ मधून अभिनेत्री चित्रांगदा सिंह देखील अचानक निघाली होती.

निर्माता राजेश भाटिया यांच्यात मतभेद असल्यामुळे मौनी रॉयने चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले. त्यानंतर राजेश तिला बेजबाबदार बोलला कारण ती अचानक चित्रपट सोडून गेली. मौनीने अचानक ‘वॉक-आउट’ चे कारण स्क्रिप्ट मधील झालेले बदलाव सांगितले. मौनीने असे वक्तव्य केले होते की, स्क्रिप्ट जशी सांगितली गेली होती तशी नव्हती. साल २०१७ मध्ये चित्रपट ‘बाबूमोशाय बंदूकबाज़’ मधून जेव्हा चित्रांगदा निघाली तर तेव्हा तिचे निर्देशकसोबत मतभेद झाले होते. चित्रांगदाला एका बोल्ड सीनवर आक्षेप होता आणि हा सीन शुट करण्याच्या वेळी दिग्दर्शक कुशान नंदीच्या बोलण्याची पद्धत जरा वेगळीच असल्यामुळे चित्रांगदाला खूप खराब वाटले. नंतर हा चित्रपट अभिनेत्री बिदिता बाग सोबत पूर्ण झाला.

nawazuddin-siddiqui-film

आता पुन्हा नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये असे पुन्हा होते आहे. एकता कपूरची मालिका ‘नगिन’ मध्ये अभिनय करणाऱ्या मौनी रॉयने अक्षय कुमारसह ‘गोल्ड’ आणि ‘KGF’ चित्रपटात एक आयटम सॉंग केले. आता या चित्रपटा मध्ये बाहुबली मधील तमन्ना भाटिया एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजच्या भावाने केले असून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटियाने चित्रपटाच्या रोलची तयारी करायला सुरवात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय 

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक 

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे 

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव