मॉडेलच्या घरात मोठी चोरी, काही मिनीटांमध्ये ‘गायब’ झाले 475 कोटींचे दागिने

लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये एका मॉडेल आणि टीव्ही अभनेत्रींच्या घरातून ४७५ कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी तमारा एकलेस्टोनच्या घरातील मौल्यवान दागिने अवघ्या ५० मिनिटांत गायब केले. तमारा ही तिचा नवरा जय रुटलंडसोबत राहते. तमारा एका आलिशान बंगल्यात राहते ज्याची किंमत अंदाजे ६६५ कोटी रुपये आहे. या प्रकरणामुळे तमाराला धक्का बसला आहे.

एका तासापेक्षा कमी वेळात चोरट्यांनी घरातील सर्व दागिने लंपास केले आहेत. दरोड्याच्या घटनेच्या काही तासांपूर्वी, तमारा ख्रिसमस हॉलिडेसाठी देशाबाहेर गेली होती. दरम्यान, लंडनमधील ज्या ठिकाणी तमारा राहते तो अत्यंत प्रतिष्ठित परिसर मानला जातो. पोलिस २४ तास त्या परिसरात हजर असतात आणि चेकपॉईंट पण असतात. परंतु चोरांनी या सर्व सुरक्षा व्यवस्थेतही चोरी केली.

तमाराच्या ५७ खोल्यांच्या बंगल्यात २४ तास गार्डही तैनात आहेत. गार्डच्या वतीने तीन चोरट्यांनी घरात घुसून ही घटना घडवून आणल्याचे समजते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/