जाणून घ्या चिंच खाण्याचे ‘हे’ 4 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आंबड-गोड लागणारी चिंच सर्वांनाच खायला खूप आवडते. फास्टफूडमधील आणि जेवणातील अनेक पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. परंतु चिंच ( Tamarind) केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही तर याचे आपल्या शरीराला खूप फायदेही होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) हायड्रॉक्सायक्ट्रीक अ‍ॅसिड – चिचेत हायड्रॉक्सायक्ट्रीक अ‍ॅसिड असतं. या घटकामुळं शरीरातील फॅट्स वाढण्याचं प्रमाण नकळत कमी होतं. इतकंच नाही तर चिंच शरीरातील फॅट्स वाढवणाऱ्या एन्झाईमचं प्रमाणही कमी करते.

2) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत – अनेकजण असे आहेत ज्यांची पचनक्रिया सुरळीत नाही अशी तक्रार करत असतात. अशा व्यक्तींनी आहारात चिंचेचा वापर करावा. चिंच खाल्ल्यामुळं पचनक्रिया सुरळीत होते.

3) बद्धकोष्ठता दूर होते – चिंचेच्या रसात बद्धकोष्ठता दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळं अशा तक्रारींवर चिंचेचा रस औषध म्हणून वापरला जातो.

4) घसा दुखत असेल तर बरा होतो – चिंच ही आंबट असल्यानं त्यात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळं घशात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.