तमाशा हे लोकरंजनाचे साधन : खा. श्रीनिवास पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे.रांगड्या मराठी मनाला रिझवणारी ही लोककला आहे. तमाशा व लोककलेबद्दल मला ममत्व आहे. तमाशा कलावंत आपल्या पैैकीच एक आहेत,लोकरंजन करताना आपल दुख: विसरून तुुुमच्या आनंदात सुख पहातोय. त्याला अंतर देेेवू नका. असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी श्रीनिवास पाटील व उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार चेतन तुपे, बाळासाहेब शिवरकर, जयमाला इनामदार, प्रशांत जगताप,नगरसेवक मारुती तुपे, विकास रासकर,प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे,अध्यक्ष देवीदास पाटील,मित्रावरुण झांबरे, रेश्मा परितेकर,श्रीधर जिंतीकर, रामदास खोमणे,संदिप घुले,डाॅ.शंतनु जगदाळे,बापू जगताप,नाना नलावडे,ज्योतिबा उबाळे, उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार स्वरूप एकवीस हजार रुपये व स्मृतीचिन्ह. डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार स्वरूप पंधरा हजार रूपये व स्मृतीचिन्ह लावणी नृत्यांगना वर्षा परितेकर यांना व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार शाहीर आदिनाथ विभूते यांना अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

तमाशा प्रधान चित्रपटाच्या माध्यमातून व गावजेत्रीतील तमाशा फडाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार नावारुपाला आले आहेत. कलेची सेवा माझ्या कडून करण्यासाठी मी प्रयत्न केला. काळ बदलत आहे तसे सादरीकरण बदलत आहेत. लोकांनाही हेच आवडत असेल तर आपण काय करणार. अशा भावना पुरस्काराला उत्तर देताना लिला गांधी यांनी व्यक्त केल्या.

प्रास्ताविक सत्यजित खांडगे यांनी केले. स्वागत जयप्रकाश वाघमारे यांनी केले. आभार मित्रावरून झांबरे यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक वाघमारे यांनी केले.

पुणे लावणी महोत्सवात बहारदार,उडत्या चालीवरील, पारंपरिक बैठकीच्या लावण्यांचे व पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. पुणेकर रसिकांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. या महोत्सवात सांगली येथील शाहीर प्रसाद विभूते व सह कलाकार, पप्पू बंड यांचा ढोलकीचा खनखनाट, जय अंबिका कला केंद्र, न्यु अंबिका कला केंद्र यांनी सहभाग घेतला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/