तामिळनाडूमध्ये BJP ची फजिती ! प्रचाराच्या Video मध्ये कार्ती चिदंबरम यांच्या पत्नीचा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तमिळनाडूमध्ये आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाला प्रचाराच्या मोर्चावर बरीच अडचण आली आहे. भाजपच्या तमिळनाडू युनिटने पक्षाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो या प्रचाराचा एक भाग होता. परंतू या व्हिडिओमधील महिला कलाकार म्हणजे काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम आहेत. हे उघडकीस आल्यानंतर भाजपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ काढला.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम एक कलाकार आणि वैद्यकीय व्यावसायिक आहेत.

बीजेपीने आपले व्हिजन आणि मॅनिफेस्टोला समोर ठेवण्यासाठी एक कॅम्पेन व्हिडीओ काढला, या व्हिडिओमध्ये तमिळनाडूच्या संस्कृतीचा उल्लेख होता. यात श्रीनिधी यांना भरतनाट्यम सादर करताना दाखवले आहे.

इतकेच नव्हे तर ज्या गाण्यातील हा भाग दाखवला गेला आहे, ते द्रमुकचे प्रमुख होते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी लिहिले होते. अशा परिस्थितीत प्रचाराचा हा व्हिडीओ भाजपसाठी अडथळे आणणारा ठरला. भाजपच्या या प्रचारावर सोशल मीडियावर ट्रॉल झाला, त्यानंतर बीजेपीने हा व्हिडीओ काढून टाकला.

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीही ट्विटरवर ही माहिती शेर केली. त्याचवेळी, तमिळनाडू काँग्रेसने असे ट्विट केले की भाजपने त्यांच्या परवानगीशिवाय श्रीनिधींचे छायाचित्र वापरले. या प्रचाराच्या व्हिडीओवरून हे सिद्ध झाले की भाजपकडे स्वतःचे कोणतेही व्हिजन नाही आहे.

तमिळनाडूमध्ये ६ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. बीजेपी यावेळीही AIADMK सोबत युती करून निवडणूक लढवत आहे. आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूतील सभांना संबोधित केले.