‘कोरोना’ संकटात मोठा दिलासा ! 15 हजार कोटींची गुंतवणूक, 47 हजार रोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे एका बाजूला सर्व उद्योग व्यावसायातून रोजगार कमी होत आहे. लहान व्यवासायापासून ते मोठ्या उद्योंगाना कामगार आणि पगार कपात करावी लागत आहे. असंघटित क्षेत्रातील अनेक जण मिळेल त्या मार्गाने गावी परत जात आहे. अशातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. देशात नव्याने 47 हजार 150 लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तामिळनाडू सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने 17 कंपन्यांसबोत 15 हजार 100 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास 47 हजार 150 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने वाहन आणि ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये करार केले आहेत. यातील नऊ करार सचिवालयात मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर अन्य आठ करार कंपन्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून केले.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार फिनलँड येथील सालकॅम्प 1 हजार 300 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. यामुळे 10 हजार लोकांना रोजगार मिळेल. सलाकॉम्प कंपनीने गेल्या वर्षी झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. चेन्नई पॉवर जनरेशन लिमिटेडने नैसर्गिक वीज निर्मिर्तीसाठी 3 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण आहे. बेरोजगारी, कामगार कपात, पगार कपातीच्या बातम्या येत असताना तामिळनाडू सरकारने दिलासा देणारी बातमी दिली आहे.