तमिळनाडूच्या कुद्दालोर मध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीला आग लागून 7 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

तमिळनाडू : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या कुद्दालोर मध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच या आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की बघता बघता संपूर्ण फॅक्ट्री जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत जळून 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर आहेत.

 

 

 

 

 

फॅक्ट्रीमध्ये धमाका झाल्यानंतर त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. फटाक्याच्या फॅक्ट्रीत लागलेल्या आगीची अधिक चौकशी सुरु आहे. ही घटना कुद्दालोर जिल्ह्यातील कट्टूमन्नारकोली भागातील एका फॅक्ट्रीमध्ये घडली आहे. हे गाव चेन्नई पासून 190 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.