पोलीस ठाण्यातच महिला कॉन्स्टेबलला बळजबरी किस

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडू पोलीस खात्याला मान शरमेनं खाली घालायला लावणारी घटना उजेडात आली आहे. त्रिचीमधील सोमरसमपेट्टाई पोलीस ठाण्यात विशेष उपनिरीक्षकानं कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलला बळजबरी किस केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी पीडितेनं तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. मात्र, या प्रकरणामुळे तामिळनाडू पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बाळ सुब्रमण्यम (वय -५०) निलंबीत करण्यात आलेल्या विशेष पोलीस उप निरीक्षकाचे नाव आहे. यावर सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे कि, हे संगनमताने करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करुन न्याय निवाडा करावा. आपण तामिळनाडू पोलिसांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या अशा एका घटनेत एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तामिळनाडूतील एका महिला अधिक्षकाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याचा काही नेते मंडळीनी निषेध देखील केला होता.

तर आणखी एका घटनेमध्ये एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने कर्तव्यावर हजर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मदत करण्याच्या नावाखाली तिचा फोन नंबर घेतला. मदत करायची लांबच त्याने पीडित महिलेला फोन करुन अश्लिल भाषेत संभाषण केले होते. पीडित महिलेने याची तक्रार तामिळनाडू पोलिसांकडे केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तामिळनाडू पोलिसांनी सहायक पोलीस उप निरीक्षकास तात्काळ निलंबीत केले होते.

या घटनांवरुन महिला सध्या कुठेच सुरक्षित नाहीत. आपण फक्त महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत असे बोलत असतो. मात्र, महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांसह इतर सामान्य महिला देखील सुरक्षीत नाहीत. त्यामुळे सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे.