तामिळनाडुत हाय अलर्ट, लष्करे तैय्यबाचे अतिरेकी घुसल्याचा संशय

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडुमध्ये सहा अतिरेकी शिरल्याचा संशय असून ते राज्यात काही घातपाती कारवाया करण्याचा संशय आहे, असा संदेश गुप्तचर विभागाने दिला असून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हाय अर्लट देण्यात आला आहे. हा संदेश अतिशय महत्वपूर्ण आणि विशेषत: कोईमतूर शहरासाठी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता हा संदेश सर्व पोलीस दलाला देण्यात आला आहे.

या इनपुट नंतर राज्यभरात गुरुवारी रात्रीपासून कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. गुप्तचरांनी दिलेल्या सूचनेनुसार, एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकन मुस्लिम यांचा समावेश आहे. ते धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे, परदेशी नागरिक सेंटर हे त्यांचे लक्ष्य असू शकते असे सांगण्यात आले आहे. त्यात कोईमतूर या शहरात त्यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

या इशाऱ्यांनंतर तामिळनाडु पोलीस सर्तक झाले असून संपूर्ण राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. किनाऱ्यांलगतच्या सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषत: श्रीलंका भारतीय किनाऱ्यांदरम्यान ज्या फेरी बोटी चालतात त्यांच्यावर अधिक नजर ठेवली जात आहे. तसेच मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –