तामिळनाडू : स्थानिक निवडणुकांमध्ये DMK आघाडीवर, पहिल्यांदाच ‘ट्रान्सजेंडर’ विजयी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये २७ आणि ३० डिसेंबर रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल थोड्या वेळात स्पष्ट होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासून तामिळनाडूतील ३१३ पंचायतींच्या मतमोजणीस सुरुवात झाली. तामिळनाडूमध्ये, स्थानिक निवडणुकांच्या मतमोजणीसाठी ३१५ केंद्रे तयार केली गेली असून सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम सत्यनारायणन यांनी निकाल जाहीर करण्याबाबत DMK च्या याचिकेवर सुनावणी केली. पक्षाने केलेल्या आरोपानुसार त्यांनी जिंकलेल्या जागांचे निकाल जाहीर केले जात नाहीत. त्याचबरोबर याप्रकरणी न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया आणि त्यानंतर वापरण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीची संख्या याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्तांना भेट दिल्यानंतर DMK चे अध्यक्ष एमके स्टालिन म्हणाले की, मतमोजणीनंतरही निकाल जाहीर झालेला नाही. DMK जिंकूनही निकाल जाहीर केला जात नाही. आतापर्यंत मतमोजणीत DMK पंचायत युनियन सदस्य पदासाठी ५०६७ पैकी ३४४ जागांच्या आघाडीवर आहे. त्याचबरोबर, जिल्हा पंचायतीच्या ५१५ वॉर्ड सदस्य पदांवर DMK आणि AIADMK १३४ जागांच्या आघाडीवर आहे.

ए. रिया ९५० मतांनी विजयी :
DMK च्या, ट्रान्सजेंडर उमेदवार ए. रिया यांनी थिरुचेंगोडे येथून निवडणूक लढली असून त्यांनी ९५० मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. मदुरै येथील अड्डापट्टी येथील ७९ वर्षीय वीरमल यांना ग्रामपंचायत अध्यक्ष पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले. कृष्णागिरीच्या के.एन. थोतिपंचायत मध्ये २१ वर्षीय अपक्ष उमेदवार जयसंध्या राणी विजयी झाल्या. ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/