तृतीयपंथ्यासाठी ‘त्यानं’ बायकोला सोडलं अन् सापडला ‘Tiktok’वर

चेन्नई : वृत्तसंस्था – तरुणांना ‘टिकटॉक’चे एकप्रकारे व्यसनच लागले आहे. हल्ली गुन्हेगार देखील ‘टिकटॉक’वर व्हिडीओ बवनत असून त्यामुळे काही जणांना तरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. ‘टिकटॉक’ जसे चांगले तसे वाईट ही असल्याची प्रचिती चेन्नई येथील एका महिलेला आली. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर तो ‘टिकटॉक’ वर सापडला आणि खरे सत्य समोर आल्यानंतर पत्नीला धक्का बसला.

तामिळनाडूतील सुरेशचे काही वर्षांपूर्वी जयापद्रासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. सर्व काही ठिक चालू असताना २०१६ मध्ये सुरेश अचानक बेपत्ता झाला. पती अचानक बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या पत्नीने पोलिसांत धाव घेत पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तिच्या घरच्यांनीही त्याला खूप शोधले मात्र तो सापडला नाही. काही दिवसांपूर्वी जयाप्रदाच्या नातेवाईकांनी सुरेशला एका महिलेसोबत ‘टिकटॉक’वर पाहिले असल्याचे सांगितले. तिने तो व्हीडीओ पोलिसांना दाखवला. त्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी सुरेशला अटक केली.

अटक केल्यानंतर सुरेशकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने जे काही सांगितले ते ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले. तसेच जयाप्रदाला आणि तिच्या नातेवाईकांना धक्का बसला. सुरेशचे आणि एका तृतीयपंथ्याचे अफेयर होते. तिच्यासोबत राहण्यासाठी सुरेशने पत्नी आणि दोन मुलींना सोडून दिले. तो तृतीयपंथ्यासोबत तीन वर्षापासून राहत होता. मात्र, त्यांनी ‘टिकटॉक’वर केलेल्या व्हिडीओमुळे तो सापडला. पोलिसांनी त्याचे आणि पत्नीचे समोपदेशन करून दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. पोलिसांच्या समोपदेशनाला यश आले असून दोघांनी पुन्हा संसार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन