IS मोडयूलचा म्होरक्या गजाआड, NIA चे तामिळनाडूत ७ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय तपाय यंत्रणेने (NIA) कोईम्बतूरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने इस्लामिक स्टेट मॉड्यूलच्या एका म्होरक्याला अटक केली आहे. तो श्रीलंका बॉम्बस्फाेटाचा मास्टरमाईंड जहरान हाशमी याच्या विचारांनी प्रभावित आहे.

एनआयएने कोईम्बतूरमध्ये ७ ठिकाणी छापे मारून आएसआयएस मॉड्यूलचा म्होरक्या मोहम्मद अझरुद्दीन याला अटक केली. तो श्रीलंका बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड हाशिम सोबत फेसबुकवरून संपर्कात होता. दोघांमध्ये नेहमी फेसबुकवरून संपर्क होत होता.

केरळमध्ये असलेल्या आयएस मॉड्यूल चा श्रीलंका दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा संशय एनआयएला होता. केरळमधील आयएसच्या केडरमधून आय़एसच्या पोस्ट्स शेअर करण्यात आल्या होत्या. श्रीलंका हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम केरळ आणि तामिळनाडूतील आयएसशी संबंधित असलेल्यांच्या संपर्कात होता होता. तीन वर्षांपासून तो त्यांच्याशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होता. एनआयएने मोहम्मद आशिफ, इस्माईल, शम्सूदीन, जफर सादिक अली आणि शाहूल हमीद यांना अटक केली होती.

हाशिम आणि केरळमधील सलाफी प्रचारकांच्या भाषणांमध्ये समानता आढळून आली आहे. दारूल कुफ्र मध्ये दोघांनी मुस्लिमांसाठी काफीरांचा धोका असल्याचे सांगितले होते. तर कासरगोड येथील आय़एसच्या अब्दुल रशिद, अशफाक मजीद, हफिजूद्दीन यांनी सलाफी प्रचारक नवास अल हिंदी चे हदिस सेंटर जॉईन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी