एनआयपीएम नॅशनल बिझनेस प्रश्नमंजुषा स्पर्धेत तामिळनाडूचा संघ विजयी

पिंपरी  : पोलिसनामा ऑनलाईन

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल  मॅनेजमेंट म्हणजेच एनआयपीएम या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील  संस्थेद्वारे  घेण्यात येणाऱ्या वर्ष २०१८ च्या   एनआयपीएम नॅशनल बिझनेस क्विझ अर्थात एनआयपीएम राष्ट्रीय बिझनेस प्रश्नमंजुषा स्पर्धेत तामिळनाडू  राज्यातील संघ विजयी ठरला आहे. एनआयपीएमच्या नयीवेली विभागाच्या या संघातील अण्णामलाई  विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी  एम. गोबीनाथ व जी. कार्तिकेयन हे दोन विद्यार्थी विजयी ठरले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात या विजयी संघाला  एनआयपीएमचे कार्यकारी संचालक एस. एन.सिंग यांच्या हस्ते रुपये वीस हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

उपविजेता प्रथम संघ ठरलेल्या कर्नाटक राज्यातील क्रिश्तू जयंती स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी एलेक्स एम. साजी व सान्या जोसेफ या दोघांना एनआयपीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे पश्चिम विभागाचे सदस्य एस. जी.चव्हाण यांच्या हस्ते रुपये पंधरा हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

तसेच उपविजेता व्दितीय  संघ ठरलेल्या औरंगाबाद येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनी अरुणिमा पुसदेकर व सुरभी आहेर यांना एनआयपीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे उत्तर विभागाचे सदस्य कॅप्टन नरेश कक्कर यांच्या हस्ते रुपये दहा हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
[amazon_link asins=’B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’444f6dc1-ac74-11e8-b94d-db151c4d62df’]
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  बोलताना इंडसर्च चे संचालक  डॉ. अशोक जोशी यांनी सांगितले  की, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे प्रत्यक्ष उद्योगजगताशी संबंधित बाबींची माहिती विद्यार्थ्याना सहजगत्या होते. तसेच व्यवस्थापनविश्व किती व्यापक आहे याबाबतही विद्यार्थ्याना माहिती उपलब्ध होते. अशा स्पर्धांमधील सहभागामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला योग्य दिशा मिळण्यास मदत होते.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन  विभागाच्या शंतनुराव  किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख डॉ. कॅप्टन. सी. एम.चितळे यांनी विद्यार्थ्याना एनआयपीएम संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती सांगितली.
[amazon_link asins=’B075X5PCX2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cff8cd2-ac74-11e8-a30b-ffac63e02003′]
याप्रसंगी कार्यक्रमाला एनआयपीएमचे  नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी,  एनआयपीएम औरंगाबाद विभाग प्रमुख सुनिल  सुतावणे,एनआयपीएमचे कार्यवाह अजय कुलकर्णी, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांच्यासह पुम्बाचे प्राध्यापक, विद्यार्थी व विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे  विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केविन फिलिप्स यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमितकुमार गिरी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. तर समारोपप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.