शुटींग संपल्याच्या आनंदात ‘या’ अभिनेत्याने चक्क 400 क्रू मेंबरला दिली सोन्याची अंगठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तमिळ अ‍ॅक्टर विजयने आपल्या आगामी सिनेमाची शुटींग पूर्ण केल्याच्या आनंदामध्ये क्रू मेंबर्सना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली आहे. मंगळवारी दुपारी सिनेमाच्या शुटींगचं शेड्युल संपलं. विजय या शेड्युलशी निगडीत 400 लोकांना सोन्याची अंगठी गिफ्ट म्हणून दिली आहे. यावर सिनेमाचं नाव Bigil(बिगिल) असं लिहिलं आहे.

निर्माती अर्चानाने केलं ट्वी
एजीएस सिनेमाची सीईओ आणि बिगिलची निर्माती अर्चना कलपतीने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहले आहे की, “या प्रेमपूर्वक गिफ्टने विजयने सुर्वांचं मन जिंकलं आहे.

सिनेमाशी संबंधित असणाऱ्या आथमाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गिफ्ट म्हणून विजयची अंगठी दाखवत आभार मानले आहेत. “देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुश ठेवो.”

या दिसणार किंग खान
हा सिनेमा या दिवाळीला रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुखनेही अभिनय केला आहे. याच सिनेमाचं पहिलं पोस्टर विजयच्या वाढदिवशी म्हणजेच 21 जून रोजी रिलीज करण्यात आलं होतं. यात विजय बाप आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर शाहरुख या सिनेमात विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा रोल लहान असणार आहे. तो फक्त क्लायमॅक्सला दिसणार आहे. विजय आणि त्याचा फाईट सीन असेल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like