धक्कादायक ! मच्छीमारांनी जाळं फेकलं, माशांऐवजी जाळ्यात अडकले 230 कोटी रूपयांचे ड्रग्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील मामल्लापुरम भागात मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्या जाळ्यात एक जड वस्तू सापडली आहे. त्यांना वाटले की, त्यांच्या जाळ्यात एक मोठा मासा आला आहे. पण त्यांनी ते बाहेर काढले तेव्हा त्यामध्ये बरीच ग्रीन पाकिटे असल्याचे त्यांनी पाहिले. ज्यात चिनी आणि इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिले गेले होते.

किनाऱ्यावर जेव्हा त्याची तपासणी केली गेली तेव्हा लक्षात आले की, ते चिनी चहाचे पाकिटे होते. त्यांच्या आत मेथाफेटामाइन आढळले. हे एक प्रकारचे ड्रग्स आहे. याला क्रिस्टल मेथ असेही म्हणतात. मच्छीमारांना सुमारे 78 किलो क्रिस्टल मेथ मिळाली. ज्याची बाजारभाव सुमारे 230 कोटी किंमत आहे. मच्छीमारांनी तातडीने सर्व क्रिस्टल मेथ पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

हे ड्रग्स जी ग्रीन पॅकेट्समध्ये आढळली ती चिनी चहाची आहेत. तामिळनाडूच्या नारकोटिक्स इंटेलिजन्स ब्युरो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते एक अत्यंत उच्च मूल्याचे ड्रग्स आहे. एक किलो ड्रग्सची किंमत सुमारे 3 कोटी रुपयांहून अधिक आहे. हे ड्रग्स श्रीलंकेमार्गे मलेशियात आणले जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या ड्रग्सला मेथ, ब्लू, आइस आणि क्रिस्टल म्हणतात. हा मुख्यतः रेव्ह पार्ट्यांमध्ये वापरला जातो.

या ड्रग्समुळे, शरीरातील मज्जासंस्थेवर वाइट परिणाम होतो. जर कोणाला या ड्रग्ससोबत पकडले तर त्याला जास्तीत जास्त 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि 2 लाखांचा दंडाची शिक्षा होऊ शकते. अशी वारंवार चूक केल्यास मृत्यूदंड होऊ शकतो. काही आठवड्यांपूर्वी, तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्येही पोलिसांनी 11.4 किलो ड्रग्स आणि 1.5 टन लाल सँडर पकडले होते. ते सर्व श्रीलंकेत जात होते.