सर्वांना वेड लावणारे ‘टिक टॉक’ ॲप होणार बंद ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत. त्यातून लोकांचे मनोरंजन केले जाते. कधीकधी फक्त मनोरंजन न होता ते अनेकदा जीवावरही बेतले आहे. देशात जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमने आंतक माजवला होता. अनेकांनी या गेममुळे आत्महत्या केली. त्यानंतर या गेमवर कारवाई करत बंदी आणली. तसंच ‘टिक-टॉक’ या व्हिडीओ ॲपवरही बंदी आणली जावी, अशी मागणी तमिळानाडू सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. तामिळनाडूचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री एम. मणिकंदन यांनी याबाबत माहिती दिली.

‘टिक टॉक’ ॲपमुळे तमिळ संस्कृतीचे पतन होत आहे. तसंच या ॲपमुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. या ॲपवर बंदी घालण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. ज्याप्रमाणे ब्ल्यू व्हेल या गेमवर बंदी आणली त्याप्रमाणे ‘टिक-टॉक’ या व्हिडीओ ॲपवरही बंदी आणली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहोत, असं मणिकंदन यांनी सांगितलं.

पाहिला गेलं तर देशात फेसबुक, व्हाट्सॲप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपनंतर आता व्हीडिओ ॲपचे वेड लोकांना लागलं आहे. यात प्रामुख्याने ‘टिक टॉक’चे चाहते खुप आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येचं याचे वेडं पहायला मिळेलं. या ॲपमध्ये एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करून ही मंडळी व्हीडिओ बनवतात. तो सोशल मीडियावर पोस्ट करतात.

वेगळी बाब म्हणजे या ॲपवरिल भन्नाट व्हीडिओंमुळे अनेक तरूण प्रसिद्ध झाले. मात्र हे तरूण प्रसिद्धीसाठी व्हीडिओ बनवताना आपला जीव देखील धोक्यात घालतात हे समोर आलं आहे. त्यामुळे यावर बंदी घालणे हे गरजेचे आहेच.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी यावर वक्तव्य केले होते. ॲपवरील व्हीडिओ पायी जर तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालणार असाल आणि या व्हिडिओंमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण झाल्यास पोलीस कारवाईचा सामना करावा लागू शकतो. तर वेळ पडल्यास संबंधितांना अटक देखील होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us