पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोमवारी सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या पक्षाच्या (मक्कल मद्रम) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार व्यक्त करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं. यावेळी आमचे नेते रजनीकांत निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्यानंतर त्यांनी लवकरच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला जाईल असं ही भाष्य केलं आहे.

राज्यात २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचा पक्ष निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे. रजनीकांत यांनी आपल्या पक्षाची ( मक्कल मद्रम) राघवेंद्र हॉलमध्ये जिल्हा सचिवांची एकत्र बैठक घेतली होती. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचा दौरा केल्यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात सर्व पक्षांची सक्रियता वाढवली आहे अशा परिस्थितीत रजनीकांत यांचा पक्ष मक्कल मद्रम निवडणुकीच्या रिंगणात उतरली का असे प्रश्न विचारून जागो जाऊ लागले आहेत.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. असं असलं तरी त्यांची अधिकृतपणे राजकारणात प्रवेश झालेला नाही. मागील वर्षी कलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उभय नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . तसेच रजनीकांत भाजपचे कमळ हाती घेतील असा एक निश्चय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात क्रांती आणायची म्हणत असल्याचं म्हटलं होतं. “आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

अफवा पत्रात म्हटलं होतं…

गेल्या महिन्यात रजनीकांत यांच्या नावानं एक पत्र फायनल झालं होतं. त्यामुळे तामिळनाडूतून राजकारणात खळबळ उडाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रजनीकांत यांचा नियोजित राजकीय प्रवेश टाळू शकतो. रजनीकांत त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर चिंतेत असल्याचं पत्रात म्हटलं होतं. त्यामुळे राजकारणात सहभागी होण्यासाठी धोकादायक ठरू शकतं; परंतु रजनीकांत यांनी हे पत्र अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

You might also like