तमीम इक्बालनं केली त्रिशतकाची कामगिरी, टीमचे सगळे ‘रेकॉर्ड’ मोडून रचला ‘इतिहास’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशचा सलामीवीर तमीम इकबालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकले आहे. यासह तमीमने आपल्या आणि आपल्या संघाच्या नावे इतिहास रचला. तमीम इकबालने फर्स्ट क्लास सामन्यात एका डावात सर्वात जास्त धावा जमावण्याचा विक्रम केला. जो यापूर्वी एका दुसऱ्या फलंदाजाच्या नावे होता.

तमीम इकबालने बांग्लादेश क्रिकेट लीगच्या एका सामन्यात रविवारी मॅच दरम्यान तिसऱ्या दिवशी नाबाद 334 धावा केल्या. बांग्लादेश फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे. तमीम इकबालने ईस्ट झोनसाठी 426 चेंडूत नाबाद 334 धावांची खेळी केली. यानंतर ईस्ट झोनच्या टीमने 2 विकेट गमावून 555 धावांची खेळी केली. याआधी सेंट्रल झोनमध्ये पहिल्या डावात 213 धावा केल्या होत्या.

बांग्लादेशच्या संघासाठी 300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या तमीम इकबालने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी 42 चौकार आणि 3 षटकारासह 334 धावांची नाबाद खेळी खेळली. यामुळे सर्वच चकीत झाले. त्याने त्याचे तिसरे शतक 407 चेंडूत पूर्ण केले. बांग्लादेशच्या फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात हा दुसरा खेळाडू आहे ज्याने दुसरे तिहेरी शतक केले. तमीमपूर्वी रकीबुल हसनने 2006-07 च्या सीजनमध्ये नाबाद 313 धावा केल्या होत्या.

तमीम इकबालने 334 धावा करुन सर्वात जास्त धावांची खेळी करत आपल्या नावे विक्रम केला. एवढेच नाही तर तमीमच्या संघाचा कर्णधार मोमिनुल हकने शानदार शतक केले. तर यासिर अलीने नाबाद 62 धावा केल्या. सेंट्रल झोनच्या संघावर पराभवाचे सावट होते. सेंट्रल झोनच्या संघाला जवळपास 200 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फक्त 5 विकेट शिल्लक आहेत.