Tanaji Sawant | चौफेर टीकेनंतर मंत्री तानाजी सावंतांनी मागितली मराठा समाजाची माफी, म्हणाले – माझं विधान खटकलं असेल तर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Tanaji Sawant | ज्याच्या विरोधात मोर्चे काढले, आरोप केले, ज्याला ब्राह्मण म्हणून हिणवले त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) बोलताना केले होते. यावरून मराठाच्या भावना दुखावल्याने संतप्त पडसाद उमटत होते. चौफेर टीका होऊ लागल्याने अखेर तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची (Maratha Society) माफी मागितली आहे.

 

माझे विधान मराठा समाजाला खटकले असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे सावंत यांनी म्हटले आहे.

 

शिंदे गटातील (Shinde Group) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा उस्मानाबाद येथे भाषण करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत तानाजी सावंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करताना म्हणत आहेत
की, राज्यात 2014 ते 2019 या कालावधीत मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आरोप केले,
मराठा क्रांती मोर्चे (Maratha Kranti Morcha) काढले, आंदोलने केली, ज्यांना ब्राह्मण म्हणून हिणवले, त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी 2017-18 मध्ये भरली.

 

Web Title :- Tanaji Sawant | after round of criticism tanaji sawant relented apologized to the maratha community

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

CM Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात नवरात्रोत्सवाच्या स्वागत कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर