Tanaji Sawant | ‘ज्यांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं, त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी 2017 मध्ये भरली’, तानाजी सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde Group) आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्याचं कौतुक केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. त्यांचा अपमान केला, आम्ही गप्प बसलो. ब्राह्मण (Brahmin) म्हणून टीका करण्यात आली. पण, त्याच ब्राह्मणाने 2017-18 ला याच मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, असं वक्तव्य तानाजी सांवत (Tanaji Sawant) यांनी केले. उस्मानाबाद (Osmanabad) येथे भाषण करतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादीला (NCP) लक्ष्य केलं आहे.
तर देवेंद्र फडणवीसांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण सांगितली. फडणवीसांनी 2017-18 मध्ये
मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकलं, दोन-तीन बॅचेस बाहेर आल्या,
त्यांना नोकऱ्ऱ्याही मिळाल्या. मात्र 2019 साली लोकांचा विश्वासघात करुन तुम्ही सत्तेत आल्यानंतर सहाच
महिन्यात आमचं आरक्षण गेलं, असे म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केला.

पुढील काही दिवसांत आणखीन नव्या मागण्या निघतील, आम्हाला एससी मधून आरक्षण (SC Reservation) द्या, आम्हाला ह्याच्यातून पाहिजे. पण, या मागचा कर्ता करविता कोण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त कोणी बोलत नाही, असे म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. दोनवर्षे आरक्षण गेल्यापासून तुम्ही गप्प आणि सत्तांतर झाल्यानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हणत मराठा समाजाला उद्देशून सावंत यांनी भाषण केले. तसेच होय, आरक्षण आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीलाही आरक्षण पाहिजे, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चाचा (Maratha Kranti Morcha) मी हितकरता आहे, त्याचा समर्थक आहे,
छातीठोकपणे सांगतो आहे. समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, वेळ आली तर सत्ता सोडेन आणि राजीनामा सुद्धा
देऊन टाकेन, असेही सावंत म्हणाले. सावंत यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत
आहे. या व्हिडिओवर अनेक मराठा समाजातील तरुणांनी नाजारी व्यक्त केल्याचे त्यांच्या पोस्टवरुन दिसून येते.

Web Title :- Tanaji Sawant | devendra fadanvis same brahmin filled the bag of marathas tanaji sawants video went viral on maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव पार्कमधील पॉश सोसायटीतील घटना

NCP | आधी म्हणाले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क…, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला!