Tanaji Sawant | प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं…, कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर तानाजी सावंत यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLA) बंडखोरी केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काल मुंबईतील शिवसेना आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आज पुण्यात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यानंतर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant ) यांनी फेसबुक पोस्ट करुन शिवसैनिकांना गंभीर इशारा दिला आहे. ‘माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत रहावं’, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

 

पुण्यातील बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant ) यांच्या मे. भेरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी सुरुवातीला नाम फलकाला काळे फासले, त्यानंतर तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पक्षात फुट पाडण्यात आमदार तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. माजी नगरसेवक विशाल धनावडे (Former Corporator Vishal Dhanawade) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

 

या घटनेनंतर आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसैनिकांना इशारा दिला आहे.
तानाजी सावंत यांनी लिहिले की, ‘आमचे गटनेते मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं…’

 

Web Title :- Tanaji Sawant | Everyone should stay within their means …, Tanaji Sawant’s warning after vandalizing the office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स