Tanaji Sawant | तानाजी सावंतांचे ते वक्तव्य दुर्दैवी, जबाबदार लोकांनी…, विखे पाटलांनी टोचले कान

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मराठा समाजाची माफी मागितली आहे. परंतु भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे कान टोचले आहेत. तानाजी सावंत यांच्याशी आपण चर्चा केली नाही, मात्र त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. जबाबदार व्यक्तींनी अशी वक्तव्य करणं, टाळलं पाहिजे असे विखे-पाटील यांनी म्हटले.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत उपसमिती नेमण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना 58 मोर्चे निघाले, एवढा असंतोष होता, पण त्यांनी आरक्षण टिकवलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अडीच वर्षात साधं कोर्टात वकिलांना पैसे देण्याचा निर्णय करु शकली नाही. आरक्षण गेले कोणामुळे? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला. सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन आहे, सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे. उपसमिती योग्य निर्णय घेईल, सर्व समाजाच्या भावना निर्णयात अंतर्भूत करु, अशी हमी त्यांनी दिली.
तानाजी सावंत यांची माफी
तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत होती.
त्यामुळे अखेर सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, मराठा समाजाची माफी मागितली आहे.
सावंत म्हणाले, मी एक लाख वेळा मराठा समाजाची (Maratha Community) माफी मागायला तयार आहे.
जर 2024 पर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर मी राजीनामा देईन आणि मोर्चात सहभागी होईल.
हा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.
मी पाळण्यातल्या बाळापासून ते 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांची माफी मागायला तयार आहे.
माझा समाज आहे मला माफी मागायला काही वाटणार नाही.
Web Title :- Tanaji Sawant | radhakrishna vikhe patil slams tanaji sawant over controversial statement on maratha reservation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान
Chandrakant Patil | ‘मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे’ – चंद्रकांत पाटील
Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी