Tanaji Sawant | व्वा रे आरोग्यमंत्री…, राज्य कोरोनाशी झुंजत होते त्यावेळी सावंत बंडाचं प्लॅनिंग करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी गौप्यस्फोट करताना म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यासाठी सगल दोन वर्ष कामाला लागलो. फडणवीस आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत सतत बैठका घेतल्या. जवळपास 100-150 बैठका झाल्याचे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितले. यावरुन राष्ट्रवादीने (NCP) सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
व्वा रे आरोग्यमंत्री…
वाह रे आरोग्यमंत्री… जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लढत होते, सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, लसीकरण (Vaccination) व्हावे, रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) बैठका घेत होतात.
आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 100-150 बैठका घेतल्या. आमदारांच मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन… pic.twitter.com/1nIliScFaW
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 28, 2023
ज्यांना राज्य एका महाभयंकर महामारीचा सामना करत असतानाही सत्ता लोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे. यापेक्षा महाराष्ट्रच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
गद्दारी करायची हे आधीच ठरले होते – जितेंद्र आव्हाड
आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते.
त्यांनी एकनाथ शिंदे बरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या.
त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 100-150 बैठका घेतल्या.
आमदारांच मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं.
म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं.
अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते,
अशा शब्दात जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी सावंत यांच्यावर घणाघात केला.
Web Title :- Tanaji Sawant Wow, Health Minister…, when the state was struggling with Corona, Sawant was planning rebellion, NCP attacked Tanaji Sawant
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन
Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून प्रतिबंधीत गुटखा जप्त, एकाला अटक