Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ॲक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या ॲमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. आता एकूण 6 शहरांमध्ये सीरिज विरोधात FIR दाखल झाल्यानंतर युपी पोलीस मेकर्सची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

तांडवच्या मेकर्सची होणार चौकशी
लखनऊच्या हजरतगंजमधून 4 पोलीस अधिकारी मुंबईत आले आहेत आणि ते आता डायरेक्टर अली अब्बास जफर, ॲमेझॉनच्या हेड अपर्णा पुरोहित, प्रोड्युसर हिमांशु किशन मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांची चौकशी करणार आहे. या सर्वांना या प्रकरणात आरोपी असल्याचं सांगितलं गेलं आहे. ज्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे अशात त्यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. पोलिसांची टीम बुधवारीच अनेक आरोपींना सवाल जवाब करणार आहे.

दरम्यान तांडव या सीरिजच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यानंतर आता ग्रेटर नोएडाच्या राबूपुरा ठाण्यात वेब सीरिजचे डायेरक्टर अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar), प्रोड्युसर, ॲक्टर सैफ अली खान, सुनील ग्रोवर, डिंपल कपाडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

सीरिजमुळं निर्माण झालेला वाद पाहिल्यानंतर डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. जफर यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांचं स्टेटमेंट जारी केलं आहे. या सीरिजची पूर्ण स्टोरी ही काल्पनिक आहे आणि कोणत्याही घटनेसोबत त्याची तुलना म्हणजे योगयोग आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी एक लांबलचक नोट लिहिली आहे.