Tandav Trailer : जेव्हा राजकारणात होणार चाणक्य निती, तेव्हा होणार तांडव, बघा जबरदस्त ट्रेलर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खानच्या ज्या वेब सिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते ती अखेर रिलीज झाली आहे. ट्रेलरमध्ये सत्तेच्या लोभाने रचलेल्या राजकारणाचा संपूर्ण जोर पाहायला मिळत आहे. यासह ट्रेलरमध्ये सैफ अली खान आणि डिंपल कपाडिया यांच्या दमदार पात्राची झलकदेखील समोर आली आहे.

तांडवचा ट्रेलरबद्दल बोलायचे झाल्यास यात पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी संघर्ष दिसत आहे. सत्तेत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची पंतप्रधानपदावर नजर आहे आणि ते मिळवण्यासाठी ते किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतात, हे सिरीज आल्यानंतर कळेल. मालिकेत, सैफ अली खान पंतप्रधान होण्याची आशा असलेल्या समर प्रताप सिंगच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर डिंपल कपाडियाचा देखील दमदार रोल आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमच्या या वेब सीरिजमध्ये सैफ आणि डिंपल व्यतिरिक्त सुनील ग्रोव्हर, अयूब खान, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सारा जेन डायस, डिनो मौर्य, गौहर खान, अनूप सोनी, कृतिका कामरा, हितेन तेजवानी, अमायरा दस्तूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तांडव वेब मालिका 15 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉनवर रिलीज होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांसाठी यापेक्षा चांगले कदाचितच काही असू शकेल.

दरम्यान, सैफ अली खानच्या तांडवाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. आपल्या आधीच्या ओटीटी परफॉर्मन्सने सैफने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामुळे चाहते त्यांच्या तांडव या वेब सीरिजसाठीही खूप उत्सुक होते. आता ट्रेलरनंतर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.