Tandav Controversy : ग्वाल्हेरमध्ये ‘तांडव’ सीरिजविरोधात FIR ! गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरूच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ॲक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या ॲमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात काही शहरात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. तसंच या सीरिजवर आणि संबंधित कलाकारांवर एफआयआर दाखल होण्याची मालिका सुरूच आहे. आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे.

अखिल भारतयी हिंदू महासभेनं ही एफआयआर दाखल केली आहे. डायरेक्टर अली अब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशु किशन मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आणि भडकवल्याचा आरोप करत ग्वाल्हेर क्राईम ब्रांचमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, ग्वाल्हेर क्राईम ब्रांच यावर नेमकी काय ॲक्शन घेतं.

आतापर्यंत 6 शहरात दाखल झाली एफआयआर
अद्याप या सीरिजविरोधात एकूण 6 शहरात FIR दाखल झाली आहे. नुकतंच आमदार राम कदम यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठिय्या आंदोलन कलं. बुधवारी राम कदम यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी तांडवमधील अभिनेता सैफ अली खानसह संबंधित कलाकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती आहे की, आयपीसीमधील कलम 153 ए, 295 ए, 505 या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.