9 महिन्यानंतर पोलिसांना आलं यश ! बेपत्ता वैष्णवीबाबत ‘ही’ माहिती आली समोर

वाशीम : पोलीसनामा ऑनलाईन –  वाशीम शहरातील लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव यांच्या बेपत्ता प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला. ९ महिन्यानंतर या हा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता तिची हत्या तिच्या जवळच्या नातेवाईकांनी केल्याचे उघड झाले आहे. मालेगावातील इराळा परिसरातील निर्जन स्थळी वैष्णवीचा मृतदेह जाळ्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे अवयव जळले नाहीत त्यांना नंतर जमिनीत पुरण्यात आले अशी धक्कदायक माहिती आरोपीने दिली. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण

इयत्ता नववीत शिकणारी वैष्णवी जाधव ही मुलगी २० जानेवारी २०२० रोजी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी पोलीसांकडे दिली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली पण काहीच हाती लागलं नाही. तपासासाठी २ पथके पण तयार करण्यात आली होती पण तरीही काहीच माहिती हाती आली नाही. या दरम्यान काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पोलिसांविरुद्ध मोर्चा सुद्धा काढला होता. पण पोलिसांनी तपास थांबवाला नाही अखेर ९ महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वैष्णवीची हत्या केलेल्या नातेवाईकांना अटक करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकाराना दिली.नात्यात वेळोवेळी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

आरोपीला २० वर्षाचा कारावास

याच दरम्यान वाशीम शहरात १३ वर्षाच्या मुलीवर बळजबरीने अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना १२ जानेवारी २०१८ रोजी घडली होती. या प्रकरणी नंदू उर्फ गजानन वामन भिंगारदिवे या 50 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी हि घराच्या आवारात खेळत होती. मात्र ती घरी परत न आल्याने तिच्या घरच्यांनी तिची शोधाशोध सुरु केली तेव्हा ती नंदू भिंगारदिवे या आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर घाबरलेल्या अवस्थेत सापडली. जेव्हा तिच्या आईने विचारपूस केली तेव्हा पीडितेने घडलेला घटनाक्रम सांगितला.