छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामुळं ‘हिरो’ बनले केळकर, ‘बिग बी’ अमिताभला देखील मागावी लागली होती माफी (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तान्हाजी – द अनसंग वॉरियरमध्ये अभिनेता शरद केळकर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. मंगळवारी तान्हाजीचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान शरद केळकरने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज्यांचे चूकीचे नाव घेणाऱ्या जर्नलिस्टला बरोबर केले त्यानंतर त्यांचे सोशल मिडियावर जोरदार कौतूक करण्यात आले.

इवेंट दरम्यान शरद केळकरला या रिपोर्टरने प्रश्न विचारला की तुम्ही शिवाजीची भूमिका साकारत आहात. तेव्हा शरदने रिपोर्टरला थांबवले आणि सांगितले की छत्रपती शिवाजी. जसे शरद केळकरने सन्मानाने छत्रपती शिवाजींचे नाव घेतले तसे हॉलमध्ये टाळ्या वाजण्यात आल्या. शरदचे कौतूक करताना एका यूजरने सांगितले की आता मी हा सिनेमा नक्की पाहणार. कारण छत्रपती शिवाजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शिवाजी महाराज्यांना समजले आहे. रिस्पेक्ट

शरद केळकरचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला व्हिडिओ ऑफ द डे सांगितले आहे. या सिनेमात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान मुख्य भूमिका साकारत आहेत. सिनेमा ओम राऊत यांचा आहे. तान्हाजी 10 जानेवारीला रिलीज होईल. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंदीला उतर आहे.

केबीसीमध्ये शिवाजी महाराज्यांचे नाव लिहिण्यावर झाला होता वाद –
काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वाद झाला होता. या शोवर बंदी आणण्यापासून बऱ्याच चर्चा झाल्या. केबीसीमध्ये शिवाजी महाराज्याचे नाव चूकीचे लिहिले होते. विरोध वाढल्याने चॅनल आणि अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली होती.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like