तान्हाजी चित्रपटातील सोयराबाई सध्या ‘या’ गोष्टीत मग्न, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच धमाल केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 26 दिवस झाले असून देखील चित्रपटाची घौडदौड अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 246 कोटींचा बिझनेस केला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री इलाक्षी गुप्ता हीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने या चित्रपटात सोयराबाईची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

अभिनेत्री इलाक्षी एक डेंटल सर्जन असून फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. ती दररोज जिममध्ये इंटेन्स वर्कआउट आणि पिलाटेस सेशन करते. त्या व्यतिरिक्त किक बॉक्सिंग सुद्धा शिकत आहे. इलाक्षीचे म्हणणे आहे की, बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी ती एक किक बॉक्सिंग शिकत आहे.

इलाक्षी एका आगामी चित्रपटासाठी किक बॉक्सिंग शिकते आहे की नाही हे आगामी काळातच कळेल. इलाक्षीने तानाजी चित्रपटातून पदार्पण करण्याआधी ‘कोल्ड लस्सी’ आणि ‘चिकन मसाला’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

तान्हाजी हा चित्रपट अजय देवगणचा 100 चित्रपट आहे. अजयने यात मराठावीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपुर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली आहे. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.