‘तान्हाजीं मालुसरें’च्या वंशजांना पटला नाही सिनेमाचा ‘शेवट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरयिर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर आधारीत हा सिनेमा आहे. तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना मात्र या सिनेमाचा शेवट आवडला नाही असं दिसत आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी यावर भाष्य करत आपली खंत व्यक्त केली आहे.

सिनेमाच्या शेवटी असं दाखवलं आहे की तान्हाजी मालुसरे उदयनभान राठोडला मारतात. तान्हाजी मालुसरेंच्या 12 व्या वंजशांची पत्नी शीतल मालुसरे यांनी तान्हाजींच्या इतिहासावर पीएचडी केली आहे. तान्हाजी सिनेमात दाखवलेल्य इतिहासाला घेऊन अनेक मत-मतांतरे आहेत. तान्हाजींच्या वंशजांनी सिनेमाच्या शेवटाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. शीतल मालुसरे यांनी म्हटलं आहे की, “उदयभान राठोडवर शेवटचा वार हे शेलार मामा करतात. त्यामुळे सिनेमात ते दाखवणं गरजेचं आहे.”

तान्हाजी सिनेमानं 200 कोटींचा टप्पा पार केला असून अजूनही या सिनेमाची कमाई सुरूच आहे. अजयचा हा 100 वा सिनेमा आहे. 200 कोटींची टप्पा पार करणारा 2020 मधील बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा ठरला आहे.