तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पाहिला ‘तान्हाजी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी ‘द अनसंग ‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यावर्षीचा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. अजय देवगण, काजोल, शरद केळकर स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमी केली आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, देशाच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात हजेरी लावली. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रविवारी (१९ जानेवारी) ला संध्याकाळी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भादौर्य, नौदल प्रमुख एडमिरल करंबीर सिंह या तिघांनी दिल्लीच्या पीव्हीआर येथे एकत्र सिनेमा पाहिला. यावेळी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अजय देवगण देखील उपस्थित होता. नेव्हीचे माजी अधिकारी हरिंदर सिक्का यांनी या फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –