‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ ! चित्रपटाच्या नावाबद्दल अजय देवगणचा ‘गौप्यस्फोट’, शरद केळकरनं सांगितला ‘हा’ अनुभव (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नरवीर तान्हाजी मालुसरे जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे अभिनेते आणि वीर तान्हाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगन तसेच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा शरद केळकर यांनी पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या अभिनेत्यांचे स्वागत खास ताशांच्या तुतारीच्या गजरात, मराठमोळ्या अंदाजात करण्यात आले. यावेळी चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता अजय म्हणाला, “तान्हाजी मालुसरे यांच्याबद्दल थोडीच माहिती उपलब्ध आहे. शाळेच्या पुस्तकात देखील थोडीच माहिती देण्यात आली आहे. पण तान्हाजी मालुसरे यांनी आपले धाडस दाखवले नसते तर इतिहास वेगळा असता. त्यांची कथा लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे.”

चित्रपटाच्या नावासंदर्भात चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आक्षेप घेण्यात आला होता. चित्रपटाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तानाजी (Tanaji)ऐवजी तान्हाजी (‘Tanhaji’) म्हणजेच ‘H’ अक्षराचा उल्लेख करण्यात आला आहे.

याबद्दल प्रश्न विचारला असता यावर अजयने उत्तर दिले. तो म्हणाला, ” या नावात कोणताच बदल करण्यात आला नाही. तानाजी मालुसरे यांचा पुतळा जिथे आहे तिथे आम्ही मराठी मध्ये ‘तान्हाजी’ असा शब्दाचा उल्लेख पहिला. म्हणूनच इंग्रजी शब्दामध्ये देखील ‘H’ म्हणजेच ‘Tanhaji’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला की, “भारतातील हा पहिला असा 3D चित्रपट आहे ज्यामध्ये वेगळ्या प्रकारचे vfx वापरण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रत्यक्षात चित्रपट पाहताना आपण चित्रपट पाहत नसून त्याचाच एक भाग असल्याचा भास होतो.” हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देऊन जाईल.

सावित्रीची भूमिका तितकीच महत्वाची

या चित्रपटात अजयची पत्नी अभिनेत्री काजोल हिनं तान्हाजी यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारली आहे. तान्हाजी यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल भूमिका साकारताना थोडीफार कल्पना येते. पण सावित्री यांच्याबद्दल तितकीशी माहिती उपलब्ध नसताना ते पात्र कसं वठवलं असा प्रश्न विचारला असता अजय देवगण म्हणाला, “चित्रपटातील सावित्रीची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. कारण एका बाजूला पतीचं लढाईला जाणं आणि दुसऱ्या बाजूला मुलाचं लग्न तरीही तिचा ठाम निर्णय घेणं हे देखील मोठं धाडसाचं होतं.” असं उत्तर अजयने दिलं. इतकेच नाही तर गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारशी आम्ही बोलणार आहोत असे देखील अजय पुढे म्हणाला.

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने साकारली आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता शरद केळकर म्हणाला, “जेव्हा मला समजलं की मला महाराजांची भूमिका साकारायची आहे तेव्हा खूप मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटलं. त्यासाठी मी पहिल्यापासूनच खूप मेहनत घेतली.” असं त्यांने सांगितलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !