Tanhaji Box Office collection day 3: चित्रपटाने केला ‘इतक्या’ कोटीचा आकडा पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ बॉक्स ऑफिसवर सतत धमाल करत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. अजय देवगणचा हा चित्रपट वर्षाचा पहिला ब्लॉकबस्टर असल्याचा अंदाज लावला जात आहे.

ट्रेड एनालिस्ट राज बंसल यांनी तिसर्‍या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ने तिसर्‍या दिवशी 25.5 कोटी कलेक्शन केले आहे. तीन दिवसांच्या कलेक्शनबरोबर चित्रपटाने एकूण 61.17 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड एक्सपर्ट यांच्या मते, तान्हाजी चित्रपटाने जर अशीच कमाई केली तर हा चित्रपट वर्षाचा पहिला ब्लॉकबस्टर ठरेल.

यापूर्वी, तान्हाजीने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी आणि तिसर्‍या दिवशी रविवारी 25.5 कोटींचे कलेक्शन केले. पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने 61.17 कोटींचा मोठा आकडा गाठला आहे. चित्रपटाच्या स्क्रिनविषयी बोलायचे म्हणले तर तान्हाजीला भारतात एकूण 3880 स्क्रीन मिळाली आहेत. यात 2 डी आणि 3 डी फॉर्मेट सामिल आहे. या चित्रपटाला परदेशात 660 स्क्रिन मिळाली आहेत, म्हणजेच एकूण तान्हाजी चित्रपट 4540 स्क्रीनमध्ये प्रदर्शित झाला आहे.

ओम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपट मराठा साम्राज्याचे शूर सैनिक तान्हाजी यांच्यावर बनला आहे. या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाविषयी लोकांमध्ये आधीच खूप क्रेझ होती. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. याशिवाय दीपिका पादुकोण स्टारर ‘छपाक’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटांना समीक्षक व प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

https://www.instagram.com/p/B7GHl58J7wB/

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/