काजोलची 76 वर्षांची आई तनुजा मुखर्जींनं मुलीच्या वाढदिवशी घातला ‘स्विमसूट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तनीषा मुखर्जी आपल्या लुकमुळं चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तनीषाला लाईमलाईटपासून दूर रहायलाच जास्त आवडतं. कालच (मंगळवार दि 3 मार्च 2020) तनीषा मुखर्जी हिनं आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. तनीषानं आपल्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत तिच्या जवळेच लोक आणि आई तनुजा मुखर्जी हीदेखील दिसली. खास बात अशी की, या पार्टीत तनीषासोबत सारेच लोक स्विमसूटमध्ये दिसून आले. या सगळ्यात विशेष बाब अशी होती ती म्हणजे 76 वर्षीय तनुजा मुखर्जी ही देखील स्विमसूटमध्ये दिसली.

तनीषाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तनीषा आणि तिची आई तनुजा सोबत सारेच खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.

तनीषानंही तिच्या इंस्टावरून वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात एक व्हिडीओदेखील आहे. काही फोटोंमध्ये तनुजा स्विमसूटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना तनीषा म्हणते, “वाढदिवसाची सुरुवात किती शानदार होती. सर्वांचे आभार. सर्वांनीच माझी खूप काळजी घेतली.” बॉलिवूड अॅक्ट्रेस काजोलची बहिण तनीषा सध्या आपली आगामी शॉर्ट फिल्म देवी च्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे.

तनीषा आणि काजोलची आई तनुजा मुखर्जी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तनुजाची गिनती बॉलिवूडमधील दिग्गज अ‍ॅक्ट्रेसमध्ये होते.

तनुजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हाथी मेरे साथी, बंदिश, अनोखा रिश्ता, स्वर्ग नर्क और अनुभव असे काही तनुजाचे क्लासिक सिनेमे सांगता येतील.