टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील फुंदेटाकळी येथील तीव्र वळणावर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शेषराव दिगंबर शिंदे (रा. सावरगाव, जि.बीड) हे मयताचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शिंदे हे त्यांच्याकडील मोटारासायकलने पाथर्डीकडे येत होते. तर पाथर्डीकडून मालेवाडी येथे पाणी घेवून जाणारा टँकर फुंदेटाकळी येथे तीव्र वळणावर आल्यावर दुचाकीला धडकला. शेषराव शिंदे हे रोडवर जोरात आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली व जागीच त्याचा मृत्यू झाला.

ह्याही बातम्या वाचा –

पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न  

‘चोरी’च्या पैशातून गावासाठी केली पाणीपुरवठा योजना 

Loading...
You might also like