मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने नियमबाह्य लसीकरण केल्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन फडणवीस यांना सवालही करण्यात आले. 45 वर्षापुढील व्यक्तींच्या गटात बसत नसताना त्नमय फडणवीस याने घेतलेल्या लसीच्या मुद्यावरुन भाजपला देखील लक्ष्य करण्यात आले. यावरुन भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय हा आपला दूरचा नातेवाईक आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
तन्मय फडणवीस याने लस घेतल्याच्या प्रकरणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांच्या टीकेला भजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना स्वत:चा प्रभाव वापरायचा असता, तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसं केलेले नाही. का उगाच कोणत्या लांबच्या नातेवाईकांचे लसीकरण त्यांना चिटकावायचा प्रयत्न करताय ? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचं आधी बोला, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.
@Dev_Fadnavis यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनीआपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती.अजूनही त्यांनी तसे केलेले नाही.का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार,महापौरांनी पात्र नसताना लस घेतलीहोती, त्याचेआधी बोला
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 20, 2021
काय आहे प्रकरण ?
देशात सध्या 45 वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणालाच परवानगी देण्यात आली असून, देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन आपण दुसरा डोस घेत्याचे त्याने म्हटले होते. यावरुन काँग्रेससह सोशल मीडियातून भाजपावर टीका झाली.
देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
तन्मनय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये. तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर ते अगदी अयोग्य आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.